उपसभापती निवडणुकीत सेनेची बाजी, भाजपचा पराभव

Foto
विधान परिषदेच्या उपसभापती निवडणूक अखेर पार पडली आहे. भाजपने ऐनवेळी हायकोर्टात धाव घेऊन निवडणूक रद्द करण्याची खेळी केली. पण, शिवसेनेने या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.
सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोर्‍हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे.  संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी  प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकाप जयंत पाटील  यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोर्‍हे यांच्या नावाची घोषणा केली. त्याआधी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवड करू नये, अशी मागणी केली होती. परंतु, सभापतींनी कोर्टात भाजप गेली आहे, कोर्टाने मला अद्याप काही कळवले नाही. त्यामुळे तुम्ही काय मागणी केली आहे, हे मान्य करणार नाही. विधिमंडळाला कोर्टाला आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सभापती म्हणून निर्णय मी घेईल, अशा शब्दात सभापती निंबाळकर यांनी दरेकर यांना फटकारून काढले होते.
भाजपची खेळी
विशेष म्हणजे, भाजपकडे संख्याबळ नसतानाही निवडणूक रद्द करण्याची खेळी केली. परंतु, शिवसेनेने भाजपचा हा डाव हाणून पाडला. उपसभापतीपदावर याआधी नीलम गोर्‍हे यांचीच निवड झाली होती. आता पुन्हा एकदा याच पदावर गोर्‍हे यांची निवड झाली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker